अमीरखान खून खटला;आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

shivrajya patra


सोलापूर : मालकाला खोटे-नाटे सांगून नोकरी घालविल्याच्या वहिमावरून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून अमीरखान पठाण याचा खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला आरोपी सागर मोहन चंदनशिवे (रा. सोलापूर) याची मुंबई उच्च न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली.     

येथील विजापूर नाका मशीदजवळ १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सागर चंदनशिवे यानं आमिर खान पठाण याने मालकाकडे खोटे नाटे सांगून नोकरी घालवली या कारणातून आलेल्या वैमनस्यातून आमिर खान हा दारू पीत बसलेला असताना, सागर याने डोक्यात लाकडी दांडका मारून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून विजापूर नाका पोलिसांनी आरोपी सागर यास अटक केली होती. 

आरोपी सागरचा जामीन अर्ज सोलापूर सेशन कोर्टाने नामंजूर केल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता.

तथाकथित नेत्र साक्षीदार राजेंद्र गायकवाड याने पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना चार दिवस घटनेची कोठेही वाच्यता केली नाही, त्याच्या जबाबावर संशय निर्माण होतो. त्यामुळे त्याच्या जबाबावर विश्वास ठेवणे धोक्याचा आहे, असा युक्तिवाद ॲड. जयदीप माने यांनी उच्च न्यायालयात केला. सरकारतर्फे ॲड. एस. एस. चौधरी यांनी काम पाहिले.

To Top