सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विकासात्मक धोरण, अल्पसंख्यांक वंचितांना न्याय देण्याची भूमिका यावर प्रभावित होऊन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा सालार यांनी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह जल्लोषपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
नई जिंदगी येथे आयोजित कार्यक्रमात, बाबा सालार यांनी पक्ष प्रवेश केल्याने त्यांचा पक्षाला फायदा होणार असून या आजूबाजूच्या सर्व प्रभागांमध्ये त्यांची मदत होईल. आगामी काळात सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणू, अशी ग्वाही अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख यांनी दिली.
बाबा सालार पक्षात आल्याने पक्षाची ताकद अजून वाढेल, बाबा यांचे समर्थक सोलापूर शहरभर असून त्यांचे पक्षात येण्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येण्याकरिता त्यांचे सहकार्य लाभेल, असं मत कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले.
या भागातील प्रभागांमध्ये बाबा आणि अमीर शेख जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू, असं मत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केले.
बाबा सालार यांच्या पक्षप्रवेशाचा निश्चितच पक्षाला फायदा होणार आहे. अल्पसंख्यांक समाजाचा विकास करणे, समाजातील प्रश्न मार्गी लावणे, याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईलआमदार इद्रीस नाईकवाडी बाबा सालार यांच्या पक्ष प्रवेशास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आज या सोहळ्यात उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा सालार आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वागीण विकासाकरिता केलेले काम आणि सोडवलेल्या समस्या तसेच शासन स्तरावर अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी मांडलेले प्रश्न, अल्पसंख्यांकाच्या अडचणीच्या काळात धावून आलेले प्रसंग याचा लेखाजोखा आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार ईद्रीस नाईकवाडी यांनी मांडला.
बाबा सालार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो, येत्या काळात अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्न सोडवण्याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. आपण सर्वजण लोकांचे प्रश्न सोडवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन देखील आमदार इद्रीस नायकवाडी यांनी केले.
याप्रसंगी आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख, ज्येष्ठ समाजसेवक सत्तार शेख, फिजाओद्दीन आबादिराजे, नासिर बागवान, जाविद मुल्ला, शकील इनामदार, शब्बीर मेमन, इम्रान सालार, वसीम शेख, रौफ अरब, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजू मोरे, नुतन अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार, वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहाराज आबादीराजे, अल्पसंख्यांक दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण संघटक जहीर शेख, प्रदीप भालशंकर, अनिल बनसोडे, सोमनाथ शिंदे, शामराव गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
... चौकट ...
... चांगला रिझल्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार : बाबा सालार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर बोलताना, सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मी व माझे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करून चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास बाबा सालार यांनी व्यक्त केला.