फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाची कामगिरी
सोलापूर : अवैध अंमली पदार्थ गांजासह परराज्यातील दोन आरोपींसह सोलापुरातील एक आरोपीस फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने गजाआड केलंय. या त्रिकुटाच्या ताब्यातून ५ किलो ३७० ग्रॅम गांजा व तीन मोबाईल असा १,३६,६०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केलाय.
११ जानेवारी रोजी सपोनि शंकर धायगुडे, व सोबतचे पोलीस पथकातील पोहेकॉ/१२३२ चुंगे, पोकॉ/२९२ चव्हाण, पोकॉ/१४५६ बडुरे, पोकॉ/१६०४ व्हटकर, पोकॉ/१८३८ पुजारी, पोकॉ/१७१० दराडे असे मिळून फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना सेवासदन शाळेच्या कम्पाऊंडलगत असलेल्या बोळात या ठिकाणी तिघे जण त्यांच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशव्यामध्ये त्यांनी आणलेल्या वस्तू संशयास्पदरित्या घेऊन जात असताना मिळून आले. त्यांचा संशय आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारत असताना उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याच्या तयारीत होते.
त्यांच्याविषयी संशय बळावल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी अविनाश राहुल जाधव (वय-१९ वर्षे, रा. नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर सध्या रा. सालीगांव, ताब्रावाडा, म्हाफ्सा, नॉर्थ गोवा), सुजल सुधीर खरे (वय-१९ वर्षे, रा.१३४ बुधवार पेठ, मिलींद नगर, सोलापूर) आणि अजय आनंद देऊस्कर (वय-२४ वर्षे, रा. घर नं.४१६ सालीगांव, ताब्रावाडा, म्हाफ्सा, नॉर्थ गोवा) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले.
त्यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या हातातील पिशवीची पाहणी केली असता, पिशव्यामध्ये अनुक्रमे १८७६ ग्रॅम गांजा, १६८८ ग्रॅम गांजा आणि १८०६ ग्रॅम गांजा असा एकूण ५३७० ग्रॅम वजनाचा गांजा त्याची एकूण किमंत ९६, ६०० रुपये हा अंमली पदार्थ गांजा, अवैधरित्या संगणमताने विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आले. या इसमांविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आलीय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१), प्रताप पोमण, वपोनि अरविंद माने, दुपोनि तानाजी दराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस हवालदार प्रविण चुंगे, पोलीस नाईक आयाज बागलकोटे, पोलीस नाईक शिवानंद भिमदे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद व्हटकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोदकुमार पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे,पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल विनायक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिनकुमार लवटे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पार पाडली.