Type Here to Get Search Results !

माजी महापौर महेश कोठे यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शिंदे प्रशालेच्या प्रांगणात तर 11 वा. नंतर अंतिम संस्कार

सोलापूर : लखनौ विमानतळावर प्रचंड धुके असल्याने एअर ॲम्बुलन्स आता टेक ऑफ करू शकत नाही. त्यामुळे माजी महापौर महेश कोठे यांचं पार्थिव घेऊन निघणारे एअर ॲम्बुलन्स  उदईक बुधवारी, १५ जानेवारी सकाळी सहा नंतर टेक ऑफ घेईल व थेट सोलापूर विमानतळावर येईल. साधारण सकाळी नऊ नंतर जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात एक तासभरासाठी महेश कोठे यांचं पार्थिव नागरिकांना  अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. 

त्यानंतर ते त्यांच्या मुरारजी पेठ येथील 'राधाश्री' निवासस्थानी आणण्यात येईल. जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वा. नंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील, असं सांगण्यात आलंय.