सोलापूर : येथील युनियन एज्युकेशन सोसायटी प्रायमरी स्कूलच्या वतीने आयोजित वार्षिक क्रिडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी, २५ जानेवारी रोजी प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. लोकशाही न्यूज-24 व लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष वसीमराजा बागवान, रिजवान शेख यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्याची प्रेरणा अशा स्पर्धांतून मिळते, शारिरीक, बौद्धीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनं स्पर्धेच्या मैदानात उतरून मैदान गाजवलं पाहिजे, असं अल्ताफ जकलेर सर यांनी आपल्या मनोगतात म्हटलं.
या समारंभात प्रमुख अतिथी वसीम राजा बागवान आणि अन्य अतिथींच्या हस्ते यशवंत खेळाडू विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांच वितरण करण्यात आले. नजीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जावेद काजी सर, रुखसाना शेख मॅडम, रजिया बिजापुरे मॅडम, जफर इंडीकर सर, फरहान नल्लामंदू सर, जावेद गदवाल सर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.