सोलापूर : येथील कुमठा नाका,व्यंकटेश नगरमधील श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ, सोलापूर संचलित श्री बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संस्था सचिवा लक्ष्मी इटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रारंभी प्रमुख पाहुणे ओम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांच्या हस्ते ध्वजारोहण व रेणुका स्विट्सचे सुभाष रेड्डी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ओम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना ऐकता व बोलत करण्यासाठी आवश्यक असणारी स्पीच ट्रेनर मशीन भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचे मत विशेष सत्कारमुर्ती समाजसेवक आनंद गोसकी यांनी व्यक्त केले. सेक्रेटरी महेश धुळम, श्रीनिवास इटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी अण्णप्पा पाटील, आनंद गोसकी, गणेश वंगा, गोकर्ण गोसकी, युवराज गोसकी, मुख्याध्यापक शामराव वाघमारे, अरविंद कुलकर्णी, सुरेश इटकर, बालाजी दिकोंडा, इक्बाल जमादार, पालक-विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले तर सुरेश इटकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.