कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे रविवारी, 26 जानेवारी रोजी प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश काशीद सर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कवायत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काशीद सर यांनी आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांनी संविधानाचे महत्त्व नागरिकांना हक्क व त्यांचे कर्तव्य याविषयी आपले विचार व्यक्त केले. 

या कार्यक्रमास ब्रह्मदेव दादा माने बँकेचे संचालक तानाजी शिनगारे, प्रगतशील बागातदार राजू मायनाळे, उद्योजक राजू ताकमोगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी केले. आभार पर्यवेक्षक गुंगे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उर्मिला बनसोडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी उपस्थित होते.

To Top