आगळा प्रजासत्ताक दिन ... ! आळणी शाळेत लोक वाट्यातील 1,88,000 रुपये किंमतीच्या शाळापूरक साहित्याचे लोकार्पण

shivrajya patra

धाराशिव : तालुक्यातील आळणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गावामधून प्रभात फेरी करण्यात आली. ग्रामपंचायत सोसायटी येथे ध्वजारोहण करून जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या भाषण स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इयत्ता तिसरी व चौथी मधील विद्यार्थ्यांचे झेंडा कवायत, डंबेल्स सादरीकरण करण्यात आले. इयत्ता सहावी व सातवी मधील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीम गीत सादर केले.

इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी देश रंगीला, इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती, सहावी मधील विद्यार्थिनी करिष्मा मुलानी हिने फिर भी दिल है हिंदुस्तानी, ऐसा देश है मेरा समूहगीत, जान्हवी पौळ हिने संदेसे आते है, इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी श्रेया माळी, साक्षी बामणे, गौरी माळी, अमृता तौर, पूर्वी सुरवसे हिने तेरी मिट्टी मे हे सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामधील त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेतील पदवीधर शिक्षक काळे सर यांच्याकडून प्रत्येकी एक प्रमाणे  200 पानी बारा डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. 

शिवनेरी मित्र मंडळ, होळी चौक, आळणी यांनी जिजाऊ जयंती निमित्त काव्यवाचन स्पर्धा घेतल्या होत्या. यामधील लहान गट व मोठा गट यामधील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी गटनिहाय 1000 रुपये ,700 रुपये, 500 रुपये, व 200 रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल गावासमोर सादर केला. मुख्याध्यापक तांबोळी यांनी केलेल्या आवाहनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी डेस्क साठी लोकवर्गणी गोळा करण्याचे ठरवले होते. यानुसार आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर यांनी 11000, माजी सरपंच संतोष बप्पा चौगुले 11000, कै. बाशुमियाँ शेख यांच्या स्मरणार्थ शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. अफसाना सलीम शेख 11000, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. संजिवनी बाबासाहेब पौळ 5000, पालक बाबासाहेब कदम 6900, शाळेतील मुख्याध्यापक 11500, प्रत्येक शिक्षक, शिक्षिका प्रत्येकी 5000 रुपये (एकूण 61500), मोहन कुलकर्णी 2300, धनंजय वीर 2500, राहुल भाऊसाहेब वीर 2500, सौ. मंगल वीर 2500, सतीश दिवेकर 2501, तानाजी सुखदेव पोळ 500 त्यांनी ड्युल डेक्ससाठी वर्गणी दिल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आणि 60 लोखंडी डेस्कचा लोकार्पण सोहळा व उद्योजक मोहन कुलकर्णी यांच्याकडून शाळेत RO वॉटर प्युरिफायर प्लांट बसवण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा तसेच त्याबद्दल त्यांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शाळेची सर्व लाईटची कामे विनामूल्य करणारे बाळासाहेब सुदाम माळी यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शाळेसाठी 3000 रू. किमतीची एअरटेल वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोपट सुरवसे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व वर्गात एअरटेल सुविधा लोकार्पण करण्यात आली.

त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे जगातील आधुनिक ज्ञान घेता येईल. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती म्हेत्रे सत्यशीला हरिदास यांना पंचायत समिती धाराशिवकडून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रमोद वीर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच संतोष चौगुले, उपसरपंच कृष्णा गाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्याम बापू लावंड, शाळा समिती अध्यक्ष श्रीमती संजीवनी पौळ, उपाध्यक्ष श्रीमती अफसाना सलीम शेख, युवा सेना तालुकाध्यक्ष वैभव वीर, ग्रामपंचायत सदस्य सुनील काळे, अक्षय कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय नांदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अनिता पौळ, सौ. रोहिणी शिवलिंग चौगुले, उषा राम यादव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेश वीर, शिक्षणप्रेमी नागरिक निलेश देशमुख, गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिदास म्हेत्रे, शिवनेरी मित्रमंडळाचे प्रसाद वीर व सर्व पदाधिकारी, गणेश निंबाळकर, ज्ञानेश्वर निंबाळकर, पवन निंबाळकर, राजाराम माळकर, सुमित वीर, हनुमंत तोडकर, अण्णासाहेब राऊत, धनंजय पोळ, धनंजय वीर, संभाजी माळी, निलेश निंबाळकर, राम माळी, लहू तोडकर, चंद्रशेखर वीर, सोनबा पौळ, नितीन पौळ, जयराम पौळ, बबन पोळ, सौ. आश्विनी शंकर यादव, सौ. पूजा पौळ, सौ. अक्का माळी, सौ. श्रीदेवी माळी, अंगद भांडेकर, सतीश कदम, सूर्यकांत वेदपाठक, राहुल माळी, मनोज वीर, सतीश दिवेकर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती म्हेत्रे सत्यशीला आणि पेठे दिनेश यांनी तर हनुमंत माने यांनी आभार मानले.

To Top