भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन जल्लोषमय वातावरणात साजरा

shivrajya patra

सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं ग्रामपंचायत कासेगांव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासेगांव पोलीस दूरक्षेत्र आणि बॅ. बाबासाहेब भोसले प्रशालेत जल्लोषमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलं. 

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कासेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तत्पूर्वी गावाच्या गौरवाचे मानबिंदू असलेल्या स्मृतिस्मारकांना ग्रामपंचायतीच्या वतीने कासेगांवचे ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. धर्मराज वाडकर आणि सहाय्यक फौजदार रशिद बाणेवाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आलं. 
या गावातून १९१४-१९१९ च्या पहिल्या महायुध्दात रणभूमीत उतरलेल्या २१ सैनिकांच्या शौर्याचं आणि एका सैनिकाच्या बलिदानाचं स्मृति जपत असलेल्या स्मारकाबरोबर 1993 मध्ये जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी आपलं प्राणार्पण केलेले शहिद वीर सैनिक शिवराम विश्वनाथ चौगुले यांच्या स्मृति स्मारकास प्रवीण चौगुले आणि शेख परिवाराच्या वतीनेही पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंकित कासेगाव पोलीस दुरुक्षेत्राच्या प्रांगणात सहाय्यक फौजदार रशीद बाणेवाले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी शंकरराव येणगुरे, नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले, माजी सरपंच नेताजी पाटील, सरपंच यशपाल वाडकर, माजी सैनिक इलाही तांबोळी, निशीकांत पाटील, ताजोद्दीन शेख, संतोष भोजने, श्याम हुडकर, शिवदास वाडकर, सुभाष येणगुरे, माजी सरपंच राजाराम चौगुले, शाम  इटुकडे, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव, जालिंदर





गायकवाड, संभाजी चौगुले, नारायण जाधव, सत्यपाल वाडकर, रामहरी पाटोळे, शाहरूख शेख, ग्राम तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, अल्लाउद्दीन शेख, अस्लम तांबोळी, शहीद पुत्र प्रवीण चौगुले, इमरान शेख, आकाश सुरवसे, रजनीकांत लोहार, पोलीस हवालदार मनोज भंडारी, पोलीस हवालदार नागेश कोणदे आणि पोलीस हवालदार सत्यजित जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिरोबा वस्ती जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

कासेगांव येथील बिरोबा वस्ती जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील आवताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते स्तंभ पूजन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर चौगुले, सोसायटी माजी चेअरमन तुकाराम जाधव, प्रमोद वाडकर, अप्पा पोपळकर, मुख्याध्यापक पुरुषोत्तम कोळी, राजशेखर बुरकुले, लता शिंदे, गोविंद आवताडे, कलावती कोले, स्वाती कोले, स्वामी मॅडम, जाधव मॅडम, अण्णा हेडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top