Type Here to Get Search Results !

...तू कोणाकडे तक्रार केली, तर तुझ्या नरड्याचा घोट घेतो; डॉक्टर महिलेची महिला कर्मचाऱ्याला धमकी

सोलापूर : ' आम्ही खूप मोठ्या पदावर आहे. आमच्या ओळखी खूप आहेत, जर तू कोणाकडे तक्रार केली तर तुझ्या नरड्याचा घोट घेण्याची धमकी महिला डॉक्टरनं दिलीय. हा प्रकार सोलापुरातील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार डॉ. राखी सुहास माने यांच्यासह दोघींविरुध्द सदर बझार पोलिसांकडं अदखलपात्र सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर महानगरपालिकेत आरोग्याधिकारी म्हणून नेमणुकीस असलेल्या डॉ. राखी माने या ना त्या निमित्ताने नेहमी चर्चेत असतात, हा स्थानिक नागरिकांचा अनुभव आहे. त्यांनी सदर बझार पोलिसांकडं 02 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करून तिघांविरुध्द दाखल केलेल्या फिर्यादीमुळं पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या.

त्याच डॉ. राखी माने यांनी एका 30 वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून  तिच्या चरित्र्यहनन केलं. डॉ. राखी माने यांनी तिचं चारित्र्यहनन करण्याबरोबरच तिच्या नरड्याचा घोट घेण्याची धमकी दिली. हा प्रकार, 04 फेब्रुवारी रोजी दुपारी 02 वा. गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालय परिसरात घडला.

तक्रारदार महिला ड्युटीवर असताना, डॉ. राखी माने व विजयमाला बेले यांनी तिच्याशी तक्रार करून उपरोक्त शब्दात कामावरून काढून टाकण्याबरोबर नरड्याचा घोट घेण्याचीही धमकी दिली. त्या महिलेच्या वरिष्ट अर्ज क्र. 306/2025 दि. 25/04/2025 अन्वये सदर बझार पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 29 एप्रिल रोजी डॉ. राखी सुहास माने (रा. बॉम्बे पार्क, जुळे सोलापूर) आणि विजयमाला बेले (रा. सिंधु विहार कॉलनी, विजापूर रोड, सोलापूर) या आरोपींविरुध्द भा. न्याय संहिता 2023 कलम, 356 (2), 351(2), प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या धमकी प्रकरणानं डॉ. माने पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आल्या आहेत.

मसपोनि जगताप या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.