सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, या महाविद्यालयाचा एच. एस. सी. 2024-25 या शैक्षणिक वर्षात विज्ञान व कला शाखेचा 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 96.66 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतून संजना रविशंकर भोसले या विद्यार्थीनीने 83.33 टक्के तर वाणिज्य शाखेमधून श्वेता माने हिने 72.33 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. या निकालात मुलींनी बाजी मारली.
विज्ञान शाखेतून सार्थक आडसकर या विद्यार्थ्यानं 81.33 टक्के गुण मिळवत द्वितीय आणि श्रध्दा शिंदे ही विद्यार्थीनी 79.17 टक्के गुण प्राप्त करून तृतिय स्थानाची मानकरी ठरली. वाणिज्य शाखेत किरण वाघमारे हा विद्यार्थी द्वितीय स्थानी राहिला. त्यास 61 टक्के गुण मिळाले, तर सागर बनसोडे 58.33 टक्के गुण प्राप्त करत तिसऱ्या स्थानी आला.
कला शाखेमधून आयेशा शेख हिने 58 टक्के गुण प्राप्त करत प्रथम स्थान, पल्लवी शिंदे- 56.33 टक्के गुण प्राप्त करत द्वितीय आणि सृष्टी घडमोडे 53.50 गुण मिळवून तृतिय स्थानी राहिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्या सुषमा नीळ, प्रा. वैभव मसलकर, प्रा. संकेत मोरे, प्रा. दिपक भोसले, एन. के. भोसले, प्रा. विश्वनाथ उपाध्ये, प्रा. श्रध्दा शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.