Type Here to Get Search Results !

बाळे गांवाजवळ हिसका मारून पळविला सोन्याचा दागिणा

सोलापूर : पुणे महामार्गावर मडकी वस्ती ते बाळे गांवादरम्यान अज्ञातांनी एका तरुणीचे दागिने हिसका मारून चोरुन नेले. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. रुपाली आहेरसन असं त्या तरुणीचं नांव असल्याचं प्राथमिक माहितीत समजतंय. तिच्या धाडसामुळं एक तोळे चोरट्यापासून वाचविण्यात घटनास्थळी सांगण्यात आलंय.

रुपाली आहेरसन शहरातून बाळे गांवाकडं जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने हिसका मारुन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते अंदाजे दीड तोळे सोन्याच्या दागिण्यांवर हात मारला. त्यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. चैन स्नॅचिंगची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते.

हल्ली अशा घटना वाढत आहेत, ही शहरातील ताज्या घटनात तिसरा प्रकार असल्याचं नागरिकांतून बोललं जात होतं, त्यात अक्कलकोट रस्त्यावरील एका घटनेचा समावेश आहे. या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल झाल्यावर अधिक माहिती पुढं येईल, असं सांगण्यात आलंय.