Type Here to Get Search Results !

बक्षी महाराज यात्रेनिमीत्त गुरूवारी, 08 मे पासून 03 दिवस कीर्तन महोत्सव-भारुडाचा कार्यक्रम

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे बक्षी हिप्परगे येथील बक्षी महाराज  यात्रेनिमीत्त गुरूवारी 08 ते 10 मे दरम्यान तीन दिवस कीर्तन महोत्सव सोहळा व भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बक्षिमहाराज यात्रा पंचकमिटी, बक्षिहिप्परगे यांच्यावतीने देण्यात आलीय.

गुरुवारी, 08 मे रोजी बक्षिमहाराज यांच्या यात्रेनिमित्त समाधीस तेलाभिषेक व काठ्यांची स्थापना, महा आरती सोहळा तर रात्री 09 वा. झी मराठी फेम कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील (बार्शी) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, 09 मे रोजी सकाळी 09 वाजता गावातून काठ्यांची भव्य अशी पारंपारिक वाद्यातून शिव-पार्वती व संभाजी राजे येसूबाराणी यांचे पारंपारिक वेशभुषेसह मिरवणूक व पुजा होणार आहे. रात्री 09 वाजता कीर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर (जळगाव) यांचं सुश्राव्य कीर्तन  तसेच रात्री 11 ते पहाटे 05 वा. पर्यंत हरिजागर होणार आहे.

शनिवारी, 10 मे रोजी रात्री 08 वाजता  कीर्तनकार ह.भ.प. हणमंत महाराज काळे  (लातूर) यांचं कीर्तन तर रात्री 10 ते पहाटे 04  वाजेपर्यंत भारुड सम्राट ह.भ.प. तानाजी महाराज कुंभार (सातारा) यांच्या भारुडाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तरी पंचक्रोशीतील नागरीकांनी या यात्रेनिमित आयोजित धार्मिक कीर्तनाचा लाभ व  भारुडाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बक्षि महाराज यात्रा पंचकमिटी, बक्षिहिप्परगे व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी आवाहन केले आहे.