Type Here to Get Search Results !

रामेश्वर उदगिरी याला अमेरिकेच्या विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मास्टर डिग्री प्रदान

सोलापूर : येथील रामेश्वर संतोष उदगिरी याने अमेरिकेतील बोस्टन येथे नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्ससेस इन मेकॅनिकल इंजिनिअर विभागातून मास्टर डिग्री संपादन केली आहे. अमेरिकेत नुकताच पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामेश्वर याने पदवी संपादन केली.

रामेश्वर हा सोलापुरातील प्रसिध्द समर्थ जाहिरात एजन्सीचे प्रमुख संतोष उदगिरी यांचे चिरंजीव आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे.