Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा गुलशन नगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मोहोळ : ७६ वा प्रजासत्ताक दिन रविवारी, २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, गुलशन नगर, मोहोळ येथे मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सिकंदर बोनगे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर संविधानाविषयी माहिती देण्यात आली.

ओ रे चिरैय्या, जय हो, My Name is Madhuri, सोशल मीडिया, Unity in Diversity, देश रंगीला च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमांसाठी स्टेज व साऊंडची उत्तम व्यवस्था सिकंदर बोनगे यांच्या वतीने करण्यात आली होती.

यावेळी जिब्राईल भाई (71 फाऊंडेशन) - ₹500, इब्राहिम भाई कुरेशी - ₹500, जुबेर भाई - ₹500, अल्ताफ कुरेशी - ₹500, शोयब भाई (गुलशन नगर) - ₹200, मुबारक शेख - ₹100, अयाज सुरखी - ₹100 आणि अहमद भाई (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, दत्तनगर) - ₹100 यांनी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी रोख रकमेची देणगी दिली.

जिब्राईल भाई (71 फाऊंडेशन), एस. एस. क्लासेस - केळी वाटप, अहमद भाई, हिलाले मॅडम आणि नबीलाल शेख यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मोहसिना मॅडम यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करून घेतली. मुख्याध्यापिका सायरा नदाफ मॅडम आणि शिक्षक अन्सारी सर यांनी इतर सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. या कार्यक्रमाला गुलशन नगर व दत्तनगर येथील अनेक पालक, शिक्षणप्रेमी, आणि मान्यवर उपस्थित होते.