Type Here to Get Search Results !

लिपिक टंकलेखक पदासाठी माजी सैनिकांनी करावेत 'या' तारखेपर्यंत अर्ज


सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे 01 लिपिक टंकलेखकाचे अशासकीय पद भरावयाचे असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.


या पदाकरिता त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येणार असून, उमेदवारांनी स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. या पदाकरीता उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन व संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदाकरीता मासिक एकत्रित मानधन 24875 रुपये देय राहील. सदर पद हे फक्त माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार आहे.

तसेच सदर पदाकरीता सैन्यातील लिपिक संवर्गातील माजी सैनिकास प्राधान्य देण्यात येईल, तरी या संधीचा सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.