Type Here to Get Search Results !

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी करावेत अर्ज


सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे अशासकीय पदे भरावयाचे असून त्यासाठी  जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रे दिनांक 05 नोव्हेंबर 2024 पूर्वी या कार्यालयात जमा करावी. दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखती घेण्यात येतील.


या पदासाठी अर्जदार युध्द विधवा, माजी सैनिकाची विधवा पत्नी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार हा युध्द विधवा किंवा माजी सैनिकांची विधवा पत्नी असावा. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षीका  मानधन प्रतिमहा 24477  रूपये  राहिल.तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे  अशासकीय माळी मानधन 13089 रुपये प्रतिमहा राहिल. माळी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

या पदासाठी  माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. परंतु अशासकीय सहायक वसतिगृह, अधिक्षीका हे पद फक्त युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी संवर्गातून भरण्यात येईल.तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी व माजी सैनिकांनी जास्तीत -जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.