सोलापूर : 'सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी' या उपक्रमाच्या माध्यमातून, दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने जनआधार फाऊंडेशनकडून संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन सुगंधी उठणे वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
'सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी' या उपक्रमातंर्गत गेल्या ५-६ वर्षांपासून परिसरामध्ये जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जातो. रविवारी, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी जवळपास २ हजारांहून अधिक कुटुंबियांना घरोघरी जाऊन नागरिकांना सुगंधी उठणे वाटप करण्यात आले.
सुगंधी उठणे हा अगदी अगरू उद, चंदन, कस्तुरी, केशर ईत्यादी सुगंधी पदार्थापासू केलेल मिश्रण असते. हा अंगास लावुन शरीर/चेहरा स्वच्छ होऊन कांती उजळते. नागरीकांना उठणे वापरण्याची माहिती देऊन शुभेच्छा संदेश देण्यात आले. नागरिकांनी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनाही दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जनआधार फाऊंडेशनकडुन महेश दासी, शाम कोटा, ऋषीकेश चिलवेरी, दिनेश सुरा, दिनेश श्रीकोंडा, शंकर म्हंता, हर्षित गोसकी यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना कोणतेही समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधण्याचं आवाहन आनंद गोसकी मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय.