सोलापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्द लाभार्थ्यांनी शसानाच्या प्रचिलीत नियमानुसार माहे नोव्हेंबर 2024 अखेर पर्यंत आपले हयातीचे दाखले जमा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील दुसरे महायुध्द लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले व एक पासपोर्ट साईज फोटो या कार्याल्यामध्ये प्रत्यक्ष अथवा पोस्टाने 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करावे.
ज्या लाभार्थींचे हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत कार्यालयास प्राप्त होणार नाहित त्यांचे अनुदान माहे डिसेंबर 2024 पासुन बंद करण्यात येईल व हयातीचे दाखले प्राप्त झालेनंतर फरकासह अनुदान देण्यात येईल. जिल्ह्यातील दुसरे महायूध्द लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले हयातीचे दाखले जमा करावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा लाभार्थ्यांच्या मृत्यूचा दाखला अर्जासहित त्यांच्याअवलंबितांनी जमा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.