Type Here to Get Search Results !

गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ; समोर आले चिंता वाढवणारं कारण !


नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतलाय. चिंता वाढविणारं कारण समोर आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

देवेंद्र फडणवीस यांना सध्या Z प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. आता, त्यातही आता वाढ करण्यात आलीय. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आता फोर्स 1 चे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडे असतील.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय.

अशी असणार फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था 
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सध्या फोर्स 1 मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले 4 कमांडो तैनात असणार आहे. एकूण 18 जवान एका वेळी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. गनमॅनच्या संख्येत वाढ करण्यात आलीय.

फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ का ?
एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी म्हटलंय.