सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने हुतात्मा शिंदे चौक परिसरातील डाळिंबी आड मैदानात एक भव्य दिव्य श्री शिवमंदिर कायमस्वरूपी बांधण्यात यावे, अशी संकल्पना चार-पाच वर्षापूर्वी शिवभक्तामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार अनेक मान्यवरांनी याकरिता निधी उपलब्ध करून दिला. सनई-चौघडाच्या निनादात 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणाने मध्यवर्ती श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या नवीन शिवमंदिर नव्या वास्तूचे पूजन करण्यात आले.
रविवारी, सकाळी दहा वाजता पाणीवेस मंडळाचे अध्यक्ष विक्रांत वानकर व उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या सपत्नीक शुभहस्ते विधिवत पुजन या वास्तूचे करण्यात आले. रविवारी, सिंहासनाधिश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचेही पुजन करून या मुर्तीची प्रतिष्ठापना केली.
या नव्या वास्तूच्या माध्यमातून श्री शिवकालीन इतिहास, अभ्यासिका, ऐतिहासिक पुस्तके, शैक्षणिक सांस्कृतिक समाजप्रबोधन असे अनेक उपक्रम पुढील काळात राबविण्यात येणार आहेत.
या प्रसंगी सर्वश्री घाडगे गुरुजी, माजी उपमहापौर ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे, राजन जाधव, विनोद भोसले, माऊली पवार, श्रीकांत डांगे, राजू सुपाते, भाऊसाहेब रोडगे, मतीन बागवान, गणेश डोंगरे, रवी मोहिते, तात्या वाघमोडे, विजय पुकाळे, विजय भोईटे, वैभव गंगणे, अनिकेत पिसे, सदशिव पवार, प्रीतम परदेशी, प्रतापसिंह चौहान, जितू वाडेकर, संजय जाधव, प्रकाश ननवरे, बसू कोळी, विवेक फुटाणे, उज्वल दिक्षीत आदी शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या सर्व कामी देवीदास घुले, भोजरंगे स्वामी आदिंनी परिश्रम घेतले.पौरोहित्य अविनाश जोशी यांनी केले.