बारबालेशी दुष्कर्म केल्याप्रकरणी सराफ माणिक नारायणपेठकर गजाआड

shivrajya patra
!

सोलापूर : बारबालेशी जबरदस्तीने दुष्कर्म केल्याप्रकरणी सराफा व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर याच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात कोठे वाच्यता केल्यास अग्निशस्त्र काढून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तिनं फिर्यादीत म्हटलंय. सराफ व्यापारी माणिक नारायणपेठकर (रा.सोलापूर) याच्याविरुध्द सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी नारायणपेठकर यास गजाआड करण्यात आलंय. तो हल्ली न्यायालयीन कोठडी असल्याचे सांगण्यात आले.

यात हकिकत अशी की, पिडीता हि कामानिमित्त फेब्रुवारी  २०२४  मध्ये सोलापूर येथे आली होती. त्यावेळी पिडीता ही तिचे भावाला अंगठी खरेदीकरिता माणिक नारायणपेठकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी माणिक नारायणपेठकर ने तिची खाजगी माहिती व कोठून आला आहात, अशी माहिती विचारली.

त्यावेळी पिडितेने त्यास मी आँर्केस्टा असून काम शोधत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने  पिडितेस माझी बर्याच बार मालकांशी ओळख आहे असे म्हणून पिडीतेसोबत सलगी वाढवली व पिडीतेचा मोबाईल नंबर मागून घेतला.तदनंतर आरोपी हा पिडीतेसोबत फोनवरून बोलणं सुरु झाले.

तद्नंतर पुन्हा पिडीता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपी चे दुकानात गेली, त्यावेळी तिने सोने खरेदी केले व आँनलाईन पेमेंट पाठवले, व तेथून निघून गेली. तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पिडीतेस सांयकाळी बार मालकाशी ओळख करून देतो, असे म्हणून सांयकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले. 

त्यामुळे पिडीता हि रिक्षा ने त्याठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली. त्या ठिकाणी आरोपीने पिडीतेवर तिच्या ईच्छेविरूध्द जबरदस्तीने तिच्याशी दुष्कर्म केले. याबाबत काही वाच्यता केलीस तर ठार मारण्याची धमकी देत, खिशातील अग्निशस्त्र काढून दाखविले, अशा आशयाची फिर्याद पिडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायणपेठकर यास ३१ मे रोजी पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

To Top