सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांनी रविवारी सकाळी महर्षी वाल्मिकी उद्यान, वाल्मिकी उद्यानात उद्यानमधील मॉर्निंग ग्रुपचे सदस्यांची भेट घेऊन उद्यानातील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी वाल्मिकी उद्यान मधील सदस्य सिध्दु गुब्याडकर, चन्नवीर चिट्टे, राजा गायकवाड यांच्या हस्ते राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते संजय कोळी, शहर उत्तर निवडणुक प्रमुख राजकुमार पाटील माजी नगरसेवक राजू भिंगारे, संजय कणके, बाळासाहेब आळसंदे, राज कबाडे, गणेश तुपसमुद्रे, श्रीकांत कांबळे मा. महादेव हारके, गिरिष अक्कलकोट्टे, गणेश सुरवसे, यल्लप्पा आवले, नागेश बडदाळ, नागण्णा ताटी, लक्ष्मीकांत उदगीरी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.