Type Here to Get Search Results !

एनटीपीसी अधिकाऱ्याच्या सही-शिक्क्याचं बनावट ऑफर लेटर देऊन ०६ लाख रुपयांची फसवणूक


सोलापूर : एन टी पी सी कंपनीत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने महिबुब हसनसाब हेमुने (रा. मड्डी वस्ती, होटगी स्टेशन) आणि त्याच्या साथीदाराने एका महिलेची जवळपास ०६ लाख रुपयांची फसवणूक केलीय. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ पासून आजतागायत घडलाय. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात जोडगोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील रहिवासी महबूब हेमुने व त्याच्या साथीदाराने रेल्वे स्टेशनजवळील काडादी चाळ मधील रहिवासी माधुरी संजय कोपरे (वय- ४७ वर्षे) यांचा विश्वास संपादन करुन, मुलास एनटीबीसी कंपनीमध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने ०५ लाख ९७ हजार रुपये घेतले. 

जवळपास ०६ लाख रुपये घेतल्यावर, एनटीपीसी अधिकारी यांचे सही शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र व ऑफर लेटर देऊन विश्वास संपादन करुन त्यापोटी ५,५०,००० रुपये आणि अमोल शरणबसेवश्वर तारापूर यांच्याकडून ४७ हजार   रुपये घेतले. अशी एकूण ५,९७,००० रुपये घेऊन आजतागायत परत न करता नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केलीय. 

याप्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महिबुब हसनसाब हेमुने (रा. मड्डी वस्ती, होटगी स्टेशन) आणि अकबर धवलजी शेख (रा. मित्र नगर, शेळगी) या दोघाविरुद्ध शनिवारी रात्री भादवि ४१९,४२०,४६७,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि कुदळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.