सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील इयत्ता पहिली ते सातवीच्या तब्बल २५ विद्यार्थ्यांनी आयटीएस परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलीय. जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे या विद्यार्थ्यांनी ही उंच आणि गरुड झेप घेतली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे जिजाऊ ज्ञान मंदिर आणि पंचक्रोशीतील पालकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 🔹नीळ सृष्टी परमेश्वर (इ.- ४ थी , जिल्हा यादीत ५ वा क्रमांक)🔸भोसले श्रुती समाधान (इ.- २ री , जिल्हा यादीत ८ वा क्रमांक)🔹कुचेकर सिया धीरज (इ.- २ री, जिल्हा यादीत ८ वा क्रमांक)🔸माळी राजलक्ष्मी खंडू (इ.- २ री, जिल्हा यादीत ५ वा क्रमांक)🔹अवताडे समर्थ कोंडीबा (इ.- २ री, जिल्हा यादीत ९ वा क्रमांक)🔸खान शाहिस्ता असगर (इ.- १ ली, केंद्र यादीत २ रा क्रमांक)🔹जाधव आर्यन सुभाष (इ.- २ री, केंद्र यादीत १ ला क्रमांक) 🔸नीळ श्रेया संतोष (इ.- २ री, केंद्र यादीत ३ रा क्रमांक)🔹मडवळकर गायत्री बसवराज (इ.- ३ री , केंद्र यादीत १ ला क्रमांक)🔸निंबाळकर मनस्वी मनोज (इ.- ३ री, केंद्र यादीत ३ रा क्रमांक)🔹गडगडे अमृता ज्ञानोबा (इ.- ३ री, केंद्र यादीत ४ था क्रमांक)🔸विश्वकर्मा सिद्धी अरुण (इ.- ३ री , केंद्र यादीत ५ वा क्रमांक)🔹परबत वैष्णवी नारायण (इ.- ३ री, केंद्र यादीत ५ वा क्रमांक)🔸पौळ भक्ती आबासाहेब (इ.- ३ री, केंद्र यादीत ६ वा क्रमांक)🔹भोसले श्रावणी संजय (इ.- ४ थी, केंद्र यादीत १ ला क्रमांक )🔸नीळ राजवीर अविनाश (इ.- ४ थी, केंद्र यादीत २ रा क्रमांक)🔹नीळ श्रुती संभाजी (इ.- ४थी, केंद्र यादीत ३ रा क्रमांक)🔸सिंग निशुकुमारी तारकेश्वर (इ.- ५ वी, केंद्र यादीत १ ला क्रमांक)🔹जाधव प्रणाली अनिल (इ.- ५ वी, केंद्र यादीत २ रा क्रमांक)🔸पवार स्वराज प्रमोद (इ.- ६ वी, केंद्र यादीत ३ रा क्रमांक)🔹चव्हाण शुभांगी संजय (इ.- ७ वी, केंद्र यादीत १ ला क्रमांक)🔸माने आकांक्षा सोमनाथ (इ.- ७ वी ,केंद्र यादीत २ रा क्रमांक)🔹नीळ शिवतेज दीपक (इ.- ७ वी, केंद्र यादीत ३ रा क्रमांक)🔸साळुंके पार्थ पांडुरंग (इ.- .७ वी, केंद्र यादीत ४ था क्रमांक) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आणि अभिनंदन संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे, रवी कोतकुंडे यांनी केला. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.