Type Here to Get Search Results !

जबरी चोरीतील गुन्हेगार बुध्दघोष जाधव एमपीडीए अन्वये स्थानबध्द


सोलापूर :  शहरातील फौजदार चावडी व जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, बुध्दघोष किर्तीपाल जाधव (वय २० वर्षे, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, दगडफेक, खंडणी, जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, घातक शस्त्रानिशी धमकावणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुध्द अशा स्वरुपाचे ०४ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्यास सोमवारी एमपीडीए अन्वये स्थानबध्द करण्यात आलंय.

बुध्दघोष जाधव याला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२३ मध्ये क.११० सी.आर.पी.सी. प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. 

त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी सोमवारी, ११ मार्च रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, फौजदार चावडी पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोउपनि विशेंद्रसिंग बायस, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.