लातूर : शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी व मराठवाडा कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी बैठक येथील अंजनी हॉटेलमध्ये सोमवारी, ११ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ०३ वा. यावेळेस पार पडली. या बैठकीत राज्याच्या अनेक जिल्ह्यातील विविध पदाच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या. वरिष्ठांच्या उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. संघटनेत स्वागत करून आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची मराठवाडा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली तर मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून महादेव कोठे यांचे निवड करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीमंत लुले व योगेश तगरखेडे जिल्हा कार्याध्यक्ष व देवणी तालुका अध्यक्ष दत्ता अर्जुने, तालुका संघटक शंकर बावचे,कार्याध्यक्ष बालाजी लासुने, जिल्हा सरचिटणीस पप्पू सावंत, करीम शेख यांची देवणी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, मार्गदर्शक दगडू पडले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
या बैठकीस सूत्रसंचालन दत्तात्रय लोभे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातून व लातूर जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी उपस्थित होते.