पंढरपूर : खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, भावी पिढी घडवणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कला, क्रीडा, लेखक, कृतिशिल, पत्रकारिता, लेखनिक अशा क्षेत्रात काम करणाऱ्या जि. प. प्राथ. चळे मुख्याध्यापिका कल्पना रामचंद्र जगताप, जि.प.प्रा. शाळा तावशी, विष्णुपंत मनोहर गावडे, आदर्श जि.प. प्राथमिक शाळा गादेगाव, माध्यमिक शाळा शिवाजी बाबा पाटील विद्यालय रोपळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक नागनाथ मुरलीधर गायकवाड, क्रीडा शिक्षक विठ्ठल नारायण उपाडे, कृतीशिल शिक्षिका स्मिता मिलिंद आटकळे, ज्युनि. कॉलेज-अनिल गणपत पवार, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. सुशिल शिंदे, लेखक अंकुश गाजरे, दै. पुढारी चे ज्येष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे, शिक्षकेत्तर कर्मचारी उत्तम दगडू फडतरे यांना आमदार दत्तात्रय सोनवणे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिक्षक सेल), बळीराम काका साठे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी), श्री विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील, काकासाहेब देशमुख (व्यापार उद्योग सेल, प्रदेशाध्यक्ष), नागेश फाटे, (तालुकाध्यक्ष), संदीप मांडवे (शहराध्यक्ष), सुभाष भोसले (प्रदेश सरचिटणीस), अभयसिंह जगताप, प्रदेश उपाध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस सौ. जयमाला गायकवाड, प्रा. बळवंत या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार चे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आयोजकांचे उत्कृष्टरित्या कार्यक्रम पार पाडल्याबद्दल विशेष कौतुक केले व पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. येथील पी.जी.पाटील सभागृह, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शनिवारी, ०३ मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला.
अभयसिंह जगताप म्हणाले की, असे पुरस्कार सोहळे भविष्यात कार्य करण्यासाठी ऊर्जा देत असतात व अजून जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असतात, यावेळी त्यांनी आयोजकांचेदेखील कौतुक केले.
सौ. जयमाला गायकवाड म्हणाल्या की, आई नंतर दुसरा गुरु शिक्षकच असतो. शिक्षकाचा सन्मान म्हणजेच राष्ट्राचा सन्मान आहे. पुरस्कार पाप्त दै. पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे म्हणाले की, मी ही एक शिक्षकच होतो, आतापर्यंत खूप पुरस्कार मिळाले, पण शिक्षक म्हणून आदर्श पत्रकार पुरस्कार हा मला थोडा आगळा-वेगळा वाटतो जो की, मला भविष्यात आणखी जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुडके मॅडम व सौ. गायकवाड मॅडम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रदेश सचिव संजय शिंदे, प्रदेश संघटक साहेबराव भुसे, जिल्हाध्यक्ष प्रशांत कोळसे, वल्लभ बारले, सुरेश जरे, सज्जन मागाडे, अभिजीत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट :
आधुनिक काळात शिक्षक आणि शिक्षण प्रक्रियेसमोर अनेक आव्हाने आहेत, त्या आव्हानांची सांगड घालून सदृढ व सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, समस्या, अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने परिश्रमाची पराकाष्टा करेन.
- दिलीपराव सोनवणे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल
चौकट :
शब्दांनी ज्ञान वाढविणारे जगण्यातून जीवन घडविणारे, मूल्यांतून तत्वे शिकविणारे समाजाला योग्य दिशा दाखविणारे प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाला अमूल्य स्थान असते अशा आदर्श शिक्षकांना पुरस्कार देतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
- अभिजीत पाटील, चेअरमन, श्री विठ्ठल सह.सा.का.