Type Here to Get Search Results !

चोरीचा मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याकरिता पोलीसाने स्वीकारली ५ हजार रुपयांची लाच


सोलापूर : चोरीचा मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याकरिता वापरकर्त्यांकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एक पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आलंय. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केलीय.  दादासाहेब बोडके असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नांव असून त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील नेमणुकीस असलेला पोलीस शिपाई दादासाहेब श्रीमंत बोडके (वय - ३२ वर्षे, पद- ब.नं. ११५२) यांनी चोरीचा मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीची पडताळणी व शहानिशा करून एसीबी च्या पथकाने रचलेल्या सापळ्यात पोलीस शिपाई दादासाहेब बोडके ०५ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारल्याच्या गुन्ह्यात त्यास मंगळवारी, ०५ मार्च रोजी रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई दादासाहेब बोडके (रा. रुम नंबर ४४, जुनी पोलीस लाईन, डी. वाय.एस.पी ऑफीसच्या पाठीमागे, अक्कलकोट) याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 याप्रकरणी मार्गदर्शन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे, पर्यवेक्षण अधिकारी एसीबी सोलापूर,चे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार-पोहेकॉ अतुल घाडगे, पोना/स्वामीराव जाधव, चापोह/राहुल गायकवाड (सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

..... आवाहन ...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. 

संपर्क पत्ता - पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई मेल-  

www.acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप- acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक- १०६४

दूरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८

व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००