सोलापूर : सोलापुरातील सुप्रसिद्ध सर्जन, होमिओपॅथी तज्ञ डॉ. डि. ई. मिस्त्री यांचे मंगळवारी, ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. बुधवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ४६, रेल्वे लाईन्स, फादर हायस्कूल जवळील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचं सांगण्यात आलंय.
वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मिस्त्री यांचे नाव आदरपूर्वक घेतले जात होते. गरजू, गरीब रुग्णांच्या मोफत सेवेसाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. प्रा. वृषाद मिस्त्री यांचे ते वडील होत.