Type Here to Get Search Results !

... खाणपट्टा व स्टोन क्रेशर करावे बंद : शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊर येथील गट नं ६०६/२ व ६०६/१ खाणपट्टा व स्टोन क्रेशर बंद  करण्यात यावे, अशी मागणी जेऊर येथील शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केलीय.



 अक्कलकोट तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे अपर जिल्हा अधिकारी गौण खनिज शाखा, नियोजित इमारत सोलापूर व प्रांत अधिकारी सोलापूर व तसेच मंडल अधिकारी जेऊर व ग्रामविकास आधिकारी जेऊर येथे  वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत खाणपट्टा व स्टोन क्रेशरवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.



खाणपट्टा व स्टोन क्रेशर येत्या ४ दिवसाच्या आत बंद करावे, अन्यथा नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर कुटुंबसहित बेमुदत साखळी उपोषण बसण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलीय.