Type Here to Get Search Results !

घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास विरोध करून जबर मारहाण ; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल



घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास विरोध करून 

जबर मारहाण; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : तुझ्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे का लावत आहे. त्यामुळे माझ्या धंद्यावर परिणाम होईल, असं म्हणत महिलेसह तिघांनी मिळून तरूणास जबर मारहाण करण्यात आलीय. ही घटना कुमठा नाका परिसरातील संजय नगरात मंगळवारी, १२ मार्च रोजी पहाटेपूर्वी घडलीय. शेषराज रमेश कांबळे असं जखमीचं नांव आहे. जखमीच्या फिर्यादीनुसार राम गायकवाड याच्यासह तिघांविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुमठा नाका संजय नगरातील रहिवाशी शेषराज रमेश कांबळे, यांनी स्वतःच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. ते कॅमेरे लावण्यास राम गायकवाड आणि त्याच्या परिवाराचा विरोध होता. सीसीटीव्ही कॅमेरामुळे आमच्या धंद्यावर वाईट परिणाम होईल, असं म्हणून गायकवाड कुटुंबीयांनी शेषराज याच्याशी वाद घातला. त्या वादात शिवीगाळी करीत लाथाबुक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत राज गायकवाड यांनं रस्त्यावर पडलेली वीट उचलून त्याच्या डोकीत मारलीय.

याप्रकरणी शेषराज कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी राम गायकवाड, मुक्ताबाई गायकवाड आणि राज गायकवाड (सर्व रा. संजय नगर, कुमठा नाका, सोलापूर) या तिघांविरुद्ध भादवि ३२४, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार इनामदार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.