सोलापूर : ट्रॅक्टरची डिलरशीप मिळवून देण्याच्या आमिषाने त्रिकुटानं १६ लाख ३० हजार रूपयाची फसवणूक केलीय. ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्याच्या नादात फसलेले योगेश बाबू दिवेकर यांनी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे धाव घेतलीय. त्यानुसार सदर बझार पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विजापूर रस्त्यावरील उत्कर्ष नगरातील रहिवासी योगेश बाबू दिवेकर (वय-३३ वर्षे) यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डिलरशीपसाठी ऑफर आहे, असे सांगितले होते. संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचा एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले, तेव्हां त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डिलरशीपची ऑफर दिली. ऑफर मिळाल्याने डिलरशिपपोटी १० मार्च २०२२ रेजी योगेश दिवेकर यांनी ०३ लाख रूपये दिले. त्यानंतर एरीया मॅनेजर ने परंडा येथील डिलरच्या मालकाकडून सब डिलर म्हणून टॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी १३ लाख ३० हजार रूपये घेतले.
पैसे घेऊन झाल्यावर योगेश दिवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी विक्रीची डिलरशीप काढून घेतली, मात्र त्यापोटी देण्यात आलेली रक्कम ऑनलाईन ट्रान्जेक्शनद्वारे देण्यात आली होती. १६ लाख ३० हजार रूपयाची डिपॉझिट आजतागायत परत केली नाही. पैशाची मागणी केली असता, सातत्याने टाळटाळ केली जात असल्याची फिर्याद योगेश दिवेकर यांनी दिलीय.
या प्रकरणी ऋषीकेश पटवारी (रा. दमाणी नगर), नितीन जाधव, प्रविण बाळासाहेब करळे (रा. परांडा जि. धाराशिव) या तिघांविरूद्ध भादवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.