शरण मठात भव्य महादासोह; ४५ हजार भक्तांनी घेतला लाभ
हुबळी महाद्वार : जगद्गुरु सिद्धारूढ महास्वामीजींच्या रथोत्सवानिमित्त, ०८ ते १० मार्च दरम्यान हुबळी महाद्वार जवळील शरण मठात भव्य महादासोह जगद्गुरु चिक्करेवणसिद्ध शिवशरण स्वामीजींच्या आशीर्वादाने श्री रेवणसिद्ध शिवशरण मठ ट्रस्ट, अक्कलकोटच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
महाप्रसाद उद्धघाटन हुबळी धारवाडचे आमदार अरविंद बेल्लद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आळंदचे चनबसव पट्टदेवरू, मैंदर्गीचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू, हुबळी धारवाड महानगरपालिकाचे नगरसेवक रामण्णा बडगेर, रेवणसिद्ध विद्या संस्था, हुबळीचे परमेश्वर बैनूर, शरण मठ अक्कलकोट ट्रस्ट अध्यक्ष माणिक निलगार व सर्व ट्रस्ट सदस्य उपस्थित होते.
या तीन दिवसात ३० क्विंटल तांदूळ भात, ०३ क्विंटल खीर, आमटी, वांगी भाजी व कडक भाकरी अशा प्रकारचा महाप्रसाद ४० ते ४५ हजार भक्तांनी लाभ घेतला. यंदा विक्रमी महाप्रसाद वितरण झाले, याची व्याप्ती असेच वाढवण्याचा संकल्प ट्रस्टचा आहे. महाप्रसाद सेवेत सहकार्य केलेल्या व सहभागी झालेल्या सर्व भक्तांचे आभार मानण्यात आलंय.