Type Here to Get Search Results !

माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

 

सोलापूर : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ०६ जानेवारी हा जन्मदिन राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते पूजन झाले, व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 



यावेळी मालक संपादक चंद्रशेखर गायकवाड, विश्वनाथ व्हनकोरे, कर्मचारी संजय घोडके, भाऊसाहेब चोरमले आदि उपस्थित होते.