सोलापूर : शेळगी मित्रनगर येथिल रहिवाशी व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे संस्थापक - अध्यक्ष ॲड. उत्तम श्रीरंग आलदर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
उत्तम आलदर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वकिलीपर्यंत शिक्षण घेतले. धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी १९८० साली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी गरजूंना अत्यल्प व्याजदर अर्थसहाय्य उपलब्ध करून देत मदत केली.
त्यांच्या अकाली निधनाने मित्र नगर परिसरासह सामाजिक, राजकीय, वकील क्षेत्रात दु:ख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ०२ मुली, ०१ मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, ०५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मित्र नगर येथील राहत्या घरापासून निघून रूपाभवानी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.