Type Here to Get Search Results !

वरळेगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन




वरळेगांव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कासेगाव/संजय पवार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव येथे क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल ईजापवार, कासेगावचे नूतन सरपंच यशपाल वाडकर, राजेंद्र कुलकर्णी, हणमंत पवार, दिपक सलवद, वरळेगाव चे माजी सरपंच श्रीमंत हक्के, ग्रामपंचायत सदस्य शिवसेना नेते सखाराम वाघ, पोलीस पाटील विकास लक्के, रा.स.प. चे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सोंडगे, ग्रामपंचायत सदस्य शामराव मळगे, तालुका पोलीस स्टेशनचे बागवान, आसिफ शेख, भाजपाचे गोविंद निकम, वडजी तांड्याचे राहुल पवार, विनोद पवार, एलआयसी ऑफिसर अनिल निकम, भारत बनसोडे, झुंबर भोसले, संस्थेचे आधारस्तंभ धोंडीराम चौधरी, वामन चौधरी, संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, अमर चौधरी, लहुजी शक्ती सेनेचे संजय गायकवाड, महेश गायकवाड आदी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.