वडजी येथे कुणबी मराठा नोंद प्रमाणपत्र वाटप
कासेगांव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे वडजी येथील मराठा समाजातील कुणबी मराठा नोंदी असलेल्या समाज घटकांना कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मौजे वडजी गावात कुणबी मराठा अशा जवळपास ५० नोंदी असल्याचा पुरावा नोंदी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या अभिलेखात मिळाळ्या होत्या. याअनुषंगाने दक्षिण सोलापूर तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी या नोंद असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी वडजीचे भाजप कार्यकर्ते मधुकर चिवरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.