Type Here to Get Search Results !

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची ११ डिसेंबरला बैठक



पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 

११ डिसेंबरला बैठक

सोलापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी, ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सभागृह क्र. ०१ विभागीय आयुक्त कार्यालय , नवीन इमारत येथे आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे  यांनी दिली.

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजीत केली जाते. तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनाबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे  पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी  विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.