घटनेचा सन्मान राखणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली : मंगल थोरात
शिवसेना उ. बा. ठा. पक्षाच्या वतीने महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
सोलापूर : सध्या सत्ताधारी भाजपाकडून बाबासाहेबांनी देशास अर्पण केलेल्या घटनेचा दुरुपयोग होत आहे, म्हणून लोकशाही धोक्यात येत आहे. घटनेचा सन्मान राखणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली होईल असे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मंगल थोरात, यांनी माध्यमांशी बोलताना अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.
विश्वरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाप्रमुख अमर पाटील महानगरपालिका क्षेत्र प्रमुख विष्णू कारमपुरी, शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवती सेना जिल्हा संघटिका पूजा खंदारे, युवती सेना शहर संघटिका रेखा आडकी, महिला आघाडी उपशहर प्रमुख मीनल दास, सरोजनी मकाई, युवराज केंगनाळ, विजय निली, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी यांच्यासह सोलापूर जिल्हा शहर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.