संगीतकार अन्नू मलिक यांच्याकडून मोहंम्मद अयाज यांची दखल

shivrajya patra

सोलापूर : नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया, मुंबई येथील एका कार्यक्रमात सोलापूरचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांची संगीत संध्या पार पडली. यावेळी संगीतकार अन्नू मलिक हे आवर्जून उपस्थित होते. 

'तुमच्या आवाजात माझी गाणी ऐकायला खुपच आवडेल, ते तुम्ही आम्हाला ऐकवावीत', असं ख्यातनाम संगीत अन्नू मलिक यांनी म्हटल्यावर मोहम्मद अयाज यांनी अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी सादर करुन संगीतकार अन्नू मलिक यांचे मन जिंकले. 

यावेळी अन्नू मलिक यांनी अयाज यांचं भरभरुन कौतुक केले. या कार्यक्रमात मुंबईचे इन्कमटॅक्स कमिशनर राधेश्याम शर्मा व दारासिंग यांचे सुपुत्र बिंदू दारासिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, अन्नू मलिक यांच्यासारख्या दिग्गज आणि गुणी कलावंताने माझी दखल घेतली, त्यांच्यासमोर त्यांचीच गाणी सादर करताना खूप अभिमान वाटला, अशी संधी प्रत्येक कलावंतास ऊर्जा देऊन जाते, असं महागायक मोहम्मद अयाज यांनी म्हटले.

छायाचित्रात संगीतकार अनू मलिक, कमिशनर राधेश्याम शर्मा यांच्यासमवेत गायक मोहम्मद अयाज
To Top