राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हाध्यक्षपदी विजय भांगे तर सरचिटणीसपदी राजाभाऊ सोनकांबळे

shivrajya patra
सोलापूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपलेला असुन रा.स.क.म.संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस हे गेल्या पाच वर्षामध्ये मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेले नसुन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूकही केलेली नाही. तसेच मध्यवर्ती संघटना बांधणीकरिता त्या- त्या खातेनिहाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधलेले नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती संघटनेमधील खातेनिहाय संघटनांचे अनेक पदाधिकारी त्यांच्यावर नाराज होते.                                

रविवारी, ०५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा.सोलापूर येथील नॉर्थकोट प्रशालेतील सभागृहात रा.स.क.म. संघटनेचे कार्याध्यक्ष सी. एस. स्वामी(मलेरिया विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित असलेल्या मध्यवर्ती संघटनेमधील अनेक पदाधिकारी तसेच खातेनिहाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी संघटना विषयक काम असमाधानकारक केले. ते त्या पदासाठी विश्वासपात्र नसल्यामुळे त्यांना बदलून नव्याने हंगामी जिल्हा पदाधिकाऱ्यांची या बैठकीत निवड करण्याचा सर्व खातेनिहाय संघटनेच्या व मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्याने तसा ठराव संमत करण्यात आला.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय विभाग) सोलापूर, शिल्प निदेशक विजय भांगे ( NPS धारक कर्मचारी ) यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून तर विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय, सोलापूर विभाग येथील (OPS धारक) राजाभाऊ सोनकांबळे यांची जिल्हा सरचिटणीसपदी तसेच सी.एस.स्वामी (मलेरिया विभाग OPS धारक) यांची कार्याध्यक्षपदी पुनश्च सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत उर्वरित खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष : विजय भांगे,(NPS धारक, आयटीआय विभाग) सरचिटणीस : राजाभाऊ सोनकांबळे, OPS धारक विभागीय सहसंचालक (उच्चशिक्षण विभाग ) कार्याध्यक्ष : सी. एस. स्वामी,(मलेरिया विभाग), निमंत्रक : बाळकृष्ण पुतळे, (आयटीआय विभाग) कोषाध्यक्ष : हुसेन बाशा मुजावर, (आरोग्य सेवा विभाग), उपाध्यक्ष : प्रकाश चव्हाण (कामगार विमा हॉस्पिटल विभाग), अशोक नागरगोजे (सार्वजनिक बांधकाम विभाग), भीमराव लोखंडे (जिल्हा कोषागार कार्यालय), प्रभाकर माने आणि  सुनील बोलाबत्तीन (व्ही.एम. मेडिकल कॉलेज विभाग), प्रवीण वाघमारे आणि एम.व्ही पटेल (मलेरिया विभाग), ए.आर. रंगरेज (हत्तीरोग विभाग), सहसचिव : संतोष भंडारी (जिल्हा कोषागार कार्यालय), मशाक मुजावर आणि फिरोज मुलाणी (सिव्हिल हॉस्पिटल विभाग), कार्यालयीन सचिव : सटवाजी होटकर (आयटीआय विभाग), शशिकांत भालेराव (भूजल व सर्वेक्षण विभाग ), संघटक : रमाकांत साळुंखे (जिल्हा परिषद विभाग), राजेंद्र शिंदे (कृषी विभाग), गौतम इंगळे (सिव्हिल हॉस्पिटल विभाग), ज्येष्ठ सल्लागार :- रघुनाथ बनसोडे (जिल्हा माहिती कार्यालय), नामदेव थोरात, (जिल्हा कोषागार कार्यालय), प्रमुख संघटक : आशुतोष नाटकर (सार्वजनिक बांधकाम विभाग) अशी जिल्हा पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते बिनविरोध टाळ्यांच्या गजरात निवड करण्यात आली.
या जिल्हा कार्यकारिणीमध्ये खातेनिहाय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आणि महिलांनाही मोठ्या प्रमाणात या नवीन कार्यकारणीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून यामध्ये एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनाही पदांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहे.असे नूतन जिल्हा अध्यक्ष विजय भांगे यांनी व्यक्त केले आहे.यानंतर सदरच्या बैठकीमध्ये राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार मंगळवारी, ०८ नोव्हेंबर रोजी राज्यभरात निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली. 

या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी जवळजवळ ५० हुन अधिक संलग्नित असलेल्या खातेनिहाय कर्मचारी संघटना आणि त्या संघटनांचे २५ हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. 

त्यामध्ये 
१)सी.एस स्वामी (मलेरिया विभाग) 
२) भीमराव लोखंडे (जिल्हा कोषागार कार्यालय) 
३) बाळकृष्ण पुतळे (आयटीआय कार्यालय विभाग)             ४) राजाभाऊ सोनकांबळे (विभागीय सहसंचालक कार्यालय,(उच्च शिक्षण) सोलापूर विभाग,                           ५) नामदेव थोरात, (जिल्हा कोषागार कार्यालय) 
६) अशोक नागरगोजे, (सार्वजनिक बांधकाम विभाग)        ७) आशुतोष नाटकर (सार्वजनिक बांधकाम विभाग) 
८) सटवाजी होटकर (आयटीआय,कार्यालय विभाग) 
९) राजेंद्र शिंदे (कृषी कार्यालय विभाग),                            १०) शशिकांत भालेराव (भुजल आणि सर्वेक्षण विभाग), ११) हुसेन बाशा मुजावर (सार्वजनिक आरोग्य विभाग), 
१२) राजेश देशपांडे (जिल्हा परिषद विभाग),              
१३) पी.सी वाघमारे (हत्तीरोग विभाग)                     
१४) रघुनाथ बनसोडे (जिल्हा माहिती कार्यालय विभाग)      १५) एम वाय पटेल, (मलेरिया रुग्णालय विभाग)              १६) एस.बी शेख (कुष्ठरोग विभाग)                              १७) एम एम मुलाणी (आरोग्य सेवा विभाग),                १८) ए. आर. रंगरेज (हत्तीरोग विभाग),                            १९) प्रकाश एस.चव्हाण (विमा रुग्णालय, सोलापूर विभाग)  २०) संतोष एल. भंडारी (जिल्हा कोषागार कार्यालय), 
२१) प्रभाकर माने (व्ही.एम. मेडिकल कॉलेज विभाग)          २२) एस.के क्षीरसागर (कृषी कार्यालय विभाग), 
२३) संकेत गायकवाड (हिवताप विभाग),                          २४) गौतम इंगळे,(सिव्हील हॉस्पिटल विभाग), 
२५), मशाक मुजावर, (वैद्यकीय महाविद्यालय विभाग),      २६) मुखत्यार शेख (आरोग्य विभाग)                                २७) सुनिल बोलाबत्तीन (व्ही.एम. मेडिकल कॉलेज विभाग) असे एकूण २८ हून अधिक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेशी सल्लग्नीत असलेल्या खातेनिहाय संघटना आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीचे सूत्रसंचलन राजाभाऊ सोनकांबळे यांनी केले तर प्रास्ताविक बाळकृष्ण पुतळे यांनी केले. सटबाजी होटकर यांनी आभार मानले. नवीन निवड झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आशुतोष नाटकर यांनी अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने बैठक संपल्याचे जाहीर केले.
To Top