सोलापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना देशाचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज असते, ती कुमठा नाका येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळे पूर्ण होत असल्याचे मत डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
मुमताज नगर कुमठा नाका येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत लायन्स क्लब आॅफ सोलापूर सेंट्रल सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती सेवा सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीं, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत येळेगावकर होते.
शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून लायन्स क्लब सदैव दिव्यांगाच्या सोबत राहिल, असे अभिवचन लायन्स क्लबचे अध्यक्ष आझम शेख यांनी दिले.
दिव्यांग सेवा हिच ईश्वर सेवा आहे असे माजी प्रांतपाल अरविंद कोणशिरसगी म्हणाले. यावेळी समाज सेवक राजू चौधरी यांनी शाळेस शिवण यंत्र भेट दिली.
विचारपीठावर एम. के. पाटील, सुगतरत्न गायकवाड, चंद्रकांत रच्चा, मतीन गदवाल, कल्पना मॅडम, संस्था सदस्य श्रीनिवास इटकर, मुख्याध्यापक अरविंद कुलकर्णी, शामराव वाघमारे, बालाजी दिकोंडा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले इरफान चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इक्बाल जमादार, श्रीनिवास पवार यांनी परिश्रम घेतले.