सौ. भागनगरी नसीमाबी आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी

shivrajya patra
सोलापूर : जनसेवा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळ्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुलकलाम उर्दू शाळा, सोलापूर च्या उपशिक्षिका सौ. भागनगरी नसीमाबी वलीयोद्दिन यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित  करण्यात आले. 

शनिवारी, ०७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्यात उद्याची भावी पिढी सक्षमपणे उभी करण्यासाठी योगदान देत असलेल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता भावना वृध्दिंगत करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. काझी, महिबूब जैनोद्दीन तांबोळी (अध्यक्ष, जनसेवा संघटना) व मा. विलास कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपशिक्षिका सौ. भागनगरी नसीमाबी वलीयोद्दिन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक अशफाक सातखेड, श्रीमती शरीफाबी भागनगरी, असिमुन्निसा नबील शेख, ईजान नबील शेख, अदिबा भागनगरी, मोहम्मद शरीफ भागनगरी, भागनगरी नजीर, भागनगरी नासरी, भागनगरी हलीमा मोहम्मद शरीफ यांनी अभिनंदन केले आहे.
To Top