'त्या' मुलाचा अपघात नसून घातपातच ! कारवाईच्या मागणीसाठी आईचा आक्रोश

shivrajya patra
सोलापूर : माझ्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा घातपात झाला आहे. त्याचा मृत्यू अपघाती झाला असल्याचा बनाव आहे. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी एका आईनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय. 

पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येथील रहिवासी असलेल्या फरिदा सिराज शेख असं आमरण उपोषणकर्त्या महिलेचं नांव आहे. तिचा मुलगा शाहरुख सिराज शेख (वय -२५ वर्ष) याचा ३० ऑगस्ट २०२३ रोजी पंढरपूर तालुक्यातील अनवली-मुंढेवाडी रस्त्यावर अपघात झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिका बोलावून त्याला उपचारासाठी पंढरपूर येथे पाठविले. त्यानंतर या घटनेची माहिती समजल्यानंतर माझा जावई रमजान मुबारक शेख व माझी मुलगी सुहाना शेख (रा. कासेगांव) हे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे गेले.


त्यावेळी जखमी शाहरूख याला अधिक उपचारासाठी त्याच दिवशी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविले. त्यावेळी माझी मुलगी व जावई हे रुग्णवाहिकेतून सोलापूराकडे जात असताना, जखमीची आई फरिदा, तुंगत येथे येऊन त्या रुग्णवाहिकेत बसून रुग्णासोबत सोलापुरात आली, तर जावई तुंगत येथेच उतरले.जखमीचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला.  

या घटनाक्रमात  माझ्या मुलाचा अपघात झाला नसून त्याचा वातापात झालेला आहे. कारण तो स्पेंडर गाडीवर गेला होता, त्यानंतर गाडीचा अपघात झाल्यानंतर त्याला अपघात स्थळावरुन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत उपचारासाठी पाठविण्यात आले, मग त्याने सोबत नेलेली स्पेंडर गाडी कुठे आहे ? असा जखमीच्या आईचा सवाल आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांना विचारले असता आम्ही अपघात स्थळी गेला होतो, पण तो गाड़ी तिथे मिळून आली नाही, तो कुणीतरी चोरुन नेली असेल असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

माझ्या मुलाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला असता, पोलीसांनी आम्हाला देता येत नसल्याने सांगितले आणि आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे सदरच्या गाडी प्रकरणामुळे आम्हाला अपघात झाला नसून घातपात केलेला आहे. त्याच्या घातपातात शाहरुख यांची पत्नी फरीना, बाबा लक्ष्मण आवाड, आपसर जाफर मुलाणी याच्यासह अन्य काहीचा सहभाग आहे. त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होऊन न्याय मिळणेस विनंती असल्याचं उपोषणास बसलेल्या फरिदा शेख यांचा आक्रोश आहे. 


To Top