पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला 'दाग' निमित्त होते, अवघे २ हजार स्विकारल्याचे !

shivrajya patra
सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला 'दाग' लागला. निमित्त होते लाच स्विकारल्याचे ! शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत बलभीम जाधव असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जाधव यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिद घेऊन कार्यरत असलेले महाराष्ट्र पोलीस, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास जागल्याचं कर्तव्य बजावतात, हे सर्वश्रुत आहे. सोलापूर शहर वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असलेले श्रीकांत जाधव यांनी, दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या दुचाकीस्वारास अडवून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करताना, ७०० रुपये ऑनलाईन दंडाची पावती देऊन स्विकारलेल्या २, ७०० रुपयांतील २, ००० रूपये स्वतःच्या फायद्यासाठी ठेऊन घेतले असता, लाचून लचपत प्रतिबंधक सोलापूर च्या पथकाने जाधव यांना दोन हजार रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पोउनि जाधव रंगेहात सापडले. या कारवाईकडे पोलीस वर्तुळात खळबळजनक प्रकार पाहिले जात आहे. ज्यांनी नागरिकांना शिस्त लावायची, तेच बेशिस्तीचे वर्तन करीत असल्याचे प्रकाशझोतात आल्यावर वर्दीला 'दाग' लागणे स्वाभाविकच आहे.

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उमाकांत महाडिक (लाप्रवि, सोलापूर), पोना/स्वामीराव जाधव, पोना अतुल घाडगे, पोकॉ सलिम मुल्ला व चालक शाम सुरवसे (सर्व नेमणूक : लाप्रवि, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
To Top