दरोडा-जबरी चोरी गुन्ह्यातील 'वाँटेड' आरोपीकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत

shivrajya patra
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीत दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात 'वाँटेड' आरोपीकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्यास अभिलेख तपासून पाहता, तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी म्हणून आढळला असून, त्याची कौशल्यपूर्ण चौकशी करता, त्याने २ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

 सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे
 यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ ख्वाजा मुजावर व पथक सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्याचा तपास करण्याकामी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, सपोनि धनंजय पोरे यांच्या पथकातील सपोफौ ख्वाजा मुजावर यांना मिळालेल्या गोपनिय खबरीनुसार अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ गावाजवळ एक इसम विनापरवाना स्वतःजवळ देशी पिस्टल बाळगत आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली.

 त्या माहितीच्या आधारे संशयित इसमास सापळा रचून ताब्यात घेतले असता, त्याचे पॅन्टीमध्ये कंबरेवर खवलेले १ देशी पिस्टल व मॅगझीनमधील २ जिवंत काडतुस असे एकुण ५०, ४०० रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर छापा कारवाईबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतास अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे करत आहे. आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या आरोपीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासमुळे त्याने या वर्षात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे २ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याचा सोलापुर ग्रामीण जिल्ह्यातील पाहिजे/फरारी अभिलेख पाहता, त्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, भादंवि क. ३९५ (पाहिजे आरोपी), मंद्रुप पोलीस ठाणे,भादंवि क. ३९५,३९५ (पाहिजे आरोपी), आणि मंद्रुप पोलीस ठाणे, भादंकि क. ३७९, ३४ (पाहिजे आरोपी) असा गुन्हेगारीचा आलेख असल्याचे तपासात पुढे आलं आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे, यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोकॉ अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, चापोकॉ दिलीप थोरात यांनी पार पाडली.
To Top