सृष्टी पिसाळ ट्रिपल जंप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

shivrajya patra
कुर्डूवाडी/हर्षल बागल :   

सोलापूर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये विनायकराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी हनुमंत पिसाळ हिने ट्रिपल जंप या प्रकारामध्ये दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

गुरुवारी, १२ ऑक्टोबर झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत
सृष्टी पिसाळ हिने ट्रिपल जंप या प्रकारात ०९.१२ मीटर उडी मारून जिल्ह्यात नवीन रेकॉर्ड स्थापन केले. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने वडिल हनुमंत पिसाळ, आई रजनी पिसाळ आणि पिसाळ कुटुंबाने आनंद व्यक्त केला. यावेळी भोसरे ग्रामस्थांच्या वतीने सृष्टीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या वतीनेही सृष्टीचा सन्मान करण्यात आला.
To Top