मुंबई : महाराष्ट्राचे महागायक विजेते तथा सोलापूर सुरमणी मोहंम्मद अयाज यांचा उद्योगपती तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमाला देशातील विविध प्रांतातून व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मोहंम्मद अयाज यांना सांगितिक क्षेत्राचा कोणताही वारसा नसताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील खेडेगाव मंद्रुप ते मलेशिया हा एक खडतर संगीत प्रवास अयाज यांनी सर्वांसमोर मांडले. देश-विदेशात आपल्या कलेच्या माध्यमातून सोलापूरचे नांवलौकीक केला. जागतिक नामांकन तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने देखील मोहम्मद अयाज यांची दखल घेतली.
अयाज यांच्या संगीत प्रवासाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला, देशातून आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सामान्य कलावंताचा सत्कार केला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, अशी भावना अयाज यांनी व्यक्त केली.
-------
फोटो : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत गायक मोहंम्मद अयाज