सोलापूर : नवरात्रौत्सव परंपरेने व शांततामय वातावरणात पार पडावा, या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाने आयोजित शांतता कमिठीच्या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसर करीत, नवरात्रोत्सव काळात अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, उत्सव काळात आवश्यक बंदोबस्त नेमूण्यात येत असून शासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन होणे अपेक्षित आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे, असे सांगून डॉ. माने यांनी उपस्थितांना
नवरात्रौत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, नवरात्रौत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे पार पडली. प्रारंभी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे, यांनी प्रास्ताविक करून बैठक आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
सर्वत्र, रविवारी, १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा करण्यात होत आहे. २४ ऑक्टोबर रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या. नवरात्रौत्सव करीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, जबरदस्तीने वर्गणी मागू नये. सर्व मंडळांनी आपल्या मंडळाची रितसर धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करावी, असे आवाहनही डॉ. राजेंद्र माने यांनी यावेळी केले.
उत्सव काळात सर्व मंडळानी सुरक्षेचा भाग म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, मंडपासाठी उभारणीसाठी मार्गदर्शक सूचना, मोकाट जनावरांपासुन मूर्तीला धोका होणार नाही याची खबरदारी अन् उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेता, देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरूष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी, प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी, मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडुन तपासणी करावी. अन्य धर्मांच्या भावना दुखावणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावी, मंडळाने स्थापन केलेल्या मुर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी असे सांगून डॉ. राजेंद्र माने यांनी सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, असे आवाहनही केले.
.............. चौकट .......
....प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था : डॉ. माने
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सूचना मांडल्या. त्यानंतर सदर सूचनांचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले. नवरात्रौत्सव मंडळानी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे. करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ. माने यांनी शेवटी केले.